December 24, 2024 8:03 PM December 24, 2024 8:03 PM

views 2

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शाम बेनेगल अनंतात विलिन

ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक दिवंगत श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या शिवाजीपार्क स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.   शाम बेनेगल यांनी  सामाजिक वास्तव आणि संवेदनशीलता यांचा सखोल वेध घेणारे चित्रपट केले. त्यांचं काम भारतीय सिनेमाला समृद्ध करणारं होतं, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शाम बेनेगल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.त्यांच्या कामाला पुढील पिढ्यांचीही प्रशंसा मिळत राहील, असं प्...