July 16, 2025 10:19 AM July 16, 2025 10:19 AM

views 45

देशभरातून शुभांशू शुक्ला यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ॲक्सिओम फोर मोहिमेतले त्यांचे तीन सहकारी काल सुखरूप पृथ्वीवर परतले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून त्यांना घेऊन निघालेलं स्पेस एक्सचं ड्रॅगन अंतराळ यान  कॅलिफोर्नियात पॅसिफिक महासागरात उतरलं. हे अंतराळवीर आता पृथ्वीवरच्या वातावरणाशी जुळवून घेण्याकरता 7 दिवस विलगीकरणात राहणार आहेत. 18 दिवसांच्या अंतराळ मुक्कामात शुक्ला यांनी भारतासाठी 7 वेगवेगळे प्रयोग केले आहेत.   ॲक्सिओम फोर मोहीम यशस्वीपणे पूर्ण करून पृथ्वीवर परतल्यानंतर काल देशभरातून शुभा...

June 28, 2025 8:19 PM June 28, 2025 8:19 PM

views 6

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात असणारे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला.  तू भारतापासून खूप दूर असलास तरी भारतीयांच्या जवळ, त्यांच्या हृदयात आहेस. तुझ्या प्रवासानं नव्या युगाचा शुभारंभ केला आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी शुभांशु यांचं कौतुक केलं आणि त्यांना त्यांच्या मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.    भारताचं प्रतिनिधीत्व करताना आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना शुभांशु यांनी व्यक्त केली. मी कधी अंतराळवीर होईन, असं मला वाटलं नव्हतं असं ...

June 27, 2025 11:00 AM June 27, 2025 11:00 AM

views 16

ॲक्सिओम फोर मोहिमेद्वारे शुभांशु शुक्ला यांच्या रूपानं पहिला भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल

ॲक्सिओम फोर या मोहिमेअंतर्गत भारतीय वायू दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीरांना घेऊन निघालेलं स्पेसएक्स ड्रॅगन हे अंतराळयान काल दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलं. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत. 1984 मध्ये राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले होते; त्यांच्यानंतर 41 वर्षांनी भारतीय अंतराळवीर अंतराळात पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारा पहिला भारतीय अंतराळवीर होण्याचा...