April 24, 2025 7:48 PM

views 20

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्येही सर्वपक्षीय बैठक

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्येही आज सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत हल्ल्याचा एकमुखी निषेध करण्यात आला आणि सरकारच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्यावर एकमत झालं. इतर राज्यात राहणाऱ्या काश्मिरी नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन या बैठकीत करण्यात आलं. नॅशनल कॉन्फरन्, भाजपा, काँग्रेस, माकप, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, अवामी इत्तेहाद पार्टीसह इतर पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते.

August 12, 2024 8:09 PM

views 15

श्रीनगरमध्ये तिरंगा यात्रेसह तिरंगा स्वाक्षरी मोहीमचं उद्घाटन

जम्मू-काश्मीर  मधल्या श्रीनगर मध्ये  तिरंगा यात्रेसह तिरंगा स्वाक्षरी मोहीम सुरु झाली आहे. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज या यात्रेसह स्वाक्षरी मोहीमेचं उद्घाटन केलं. हजारो नागरिकांचा समावेश असलेल्या तिरंगा यात्रेत सिन्हा स्वतः सहभागी झाले होते. जम्मू काश्मीरमधल्या  हर घर तिरंगा मोहीमेचं  सामाजिक चळवळीत रूपांतर झालं असल्याचं ते यावेळी म्हणाले. या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी  यावेळी केलं.