November 18, 2024 7:58 PM November 18, 2024 7:58 PM
8
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसनायके पुढच्या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसनायके पुढच्या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. श्रीलंकेचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री विजिता हेरथ यांनी आज बातमीदारांशी बोलतान ही माहिती दिली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या श्रीलंका दौऱ्यात दिसनायके यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं होतं. डिसेंबरच्या मध्यावर अपेक्षित असलेल्या या दौऱ्यात दिसनायके भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील, असं हेरथ यांनी सांगितलं.