November 13, 2025 6:58 PM November 13, 2025 6:58 PM

views 25

भारत आणि श्रीलंका मित्र शक्ती संयुक्त लष्करी सरावाची अकरावी आवृत्ती सुरू

भारत आणि श्रीलंका या देशांमधल्या मित्र शक्ती २०२५ या संयुक्त लष्करी सरावाची अकरावी आवृत्ती कर्नाटकात बेळगाव इथे सुरू आहे. हा सराव गेल्या सोमवारपासून सुरू झाला असून येत्या २३ तारखेपर्यंत चालणार आहे. या सरावात आजच्या चौथ्या दिवशी ड्रोन ड्रील्ससह विविध लष्करी कवायतींचं व्यावहारिक प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. तसंच शोधमोहिम आणि नवीन तंत्रज्ञान असलेल्या उपकरणांचं प्रात्यक्षिकही सादर झालं. दोन्ही देशांमधली कायमस्वरुपी संरक्षण भागीदारी, कार्यक्षमता आणि परस्पर विश्वास अधोरेखित करणारा हा सराव असल्याचं भारत...

December 16, 2024 1:26 PM December 16, 2024 1:26 PM

views 12

प्रधानमंत्री श्रीलंकेच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय चर्चा करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. दिसानायके आणि त्यांच्याबरोबरच्या मान्यवरांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत  करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु  आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. अनुरा कुमारा दिसानायके तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून आज संध्याकाळी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती जगदीप धनघड यांची भेट घेणार आहेत. तसंच बिहारमधल्या बौद्ध गया इथंही...

September 22, 2024 1:41 PM September 22, 2024 1:41 PM

views 8

श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू, अनुरा कुमारा दिसानायके आघाडीवर

श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी कडक बंदोबस्तात सुरू आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार एनपीपी चे उमेदवार अनुरा कुमारा दिसानायके ४४ टक्के मतं मिळवून आघाडीवर आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी साजिथ प्रेमदासा ३० टक्के मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहेत, अशी माहिती श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीलंकेत आज संचारबंदी लागू करण्यात आली होती.

August 5, 2024 12:12 PM August 5, 2024 12:12 PM

views 18

पन्नास षटकांच्या दुसऱ्या सामन्यात यजमान श्रीलंकेची भारतावर मात

भारत आणि श्रीलंका यांच्यात काल झालेल्या 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत विजयासाठी 241 धावाचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ 208 धावाच करु शकला. श्रीलंकेच्या जेफ्री व्हॅडरसनने भारताचे प्रमुख सहा गडी बाद केले.

July 26, 2024 1:18 PM July 26, 2024 1:18 PM

views 9

श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी होणार

श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी होणार आहे. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं १५ ऑगस्टपर्यंत यासाठी अर्ज मागवले आहेत. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे ५ लाख मतांनी विजयी झाले होते. मात्र त्यानंतर आलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटामुळं त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर उर्वरित कालावधीसाठी संसदेनं रानिल विक्रमसिंघे यांना राष्ट्रपतीपदासाठी निवडून दिलं होतं.