August 11, 2025 3:00 PM August 11, 2025 3:00 PM

views 2

तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त राज्यातल्या शिव मंदीरांमध्ये गर्दी

तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं आज राज्यातल्या शिव मंदीरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.   मराठवाड्यात वेरुळ इथलं घृष्णेश्वर, परळी इथलं वैद्यनाथ आणि औंढा इथल्या नागनाथ, या ज्योतिर्लिंग स्थळीदेखील नागरिक मोठ्या संख्येनं दाखल होत आहे. स्थानिक प्रशासनांनी भाविकांच्या सोयी सुविधांसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.   नाशिक जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.