November 6, 2025 7:23 PM November 6, 2025 7:23 PM
22
ISF नेमबाजी स्पर्धेत मनू भाकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सामील होणार
इजिप्तमध्ये कैरो इथे आजपासून सुरू होणाऱ्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत मनू भाकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सामील होणार आहे. पिस्तुल प्रकारात मनू भाकर, ईशा सिंग आणि सुरूची सिंग देशाचं प्रतिनिधित्व करतील. रायफल नेमबाजीत, रुद्रांक्ष पाटील, स्वप्नील कुसळे सहभागी होतील, अनुभवी नेमबाज एलाव्हेनिल वलारिवन, सिफ्ट कौर समरा, अर्जुन बाबुता, अनिश भानवाला आणि ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांचाही भारतीय चमूत सहभाग आहे. स्पर्धेत ७२ देशांतील ७२० नेमबाज सहभागी होतील.