November 11, 2025 1:41 PM November 11, 2025 1:41 PM

views 15

ISSF Championships: १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सम्राट राणाला सुवर्णपदक

इजिप्तमध्ये कैरो इथे सुरू असलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सम्राट राणा याने काल सुवर्णपदक जिंकलं. त्याने २४३ पूर्णांक ७ गुणांची कमाई केली. एअर पिस्तुल गटात वैयक्तिक जागतिक विजेतेपद मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.   याच स्पर्धेत वरुण तोमरला कांस्यपदक मिळालं आहे. या दोन्ही नेमबाजांनी पात्रता फेरीत प्रत्येकी ५८६ गुणांची कमाई केली आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकाराच्या सांघिक स्पर्धेतही भारताच्या सम्राट राणा, वरु...

December 25, 2024 7:48 PM December 25, 2024 7:48 PM

views 10

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग नारुका जोडीला विजेतेपद

नवी दिल्लीत आज झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग नारुका या जोडीनं स्कीट मिश्र सांघित प्रकारात विजेतेपद पटाकवलं.डॉ. करणी सिंग शूटिंग रेंजमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात, महेश्वरी आणि अनंतजीत जोडीनं उत्तर प्रदेशच्या मैराज अहमद खान आणि अरीबा खान यांना ४४-४३ असा पराभव केला.

July 30, 2024 9:49 AM July 30, 2024 9:49 AM

views 14

पॅरिस ऑलिम्पिक नेमबाजीच्या मिश्रप्रकारात भारताची जोडी आज कास्य पदकासाठी लढणार

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धांमध्ये काल नेमबाजीमध्ये 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताच्या मानू भाकर आणि सरबज्योत सिंह यांच्या जोडीने उत्तम कामगिरी केली असून ते कांस्य पदकासाठीच्या सामन्यासाठी पात्र ठरले आहेत. आज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १ वाजता त्यांचा सामना दक्षिण कोरियाच्या जोडीशी होणार आहे.   हॉकी मध्ये काल पूल बी सामन्यात भारताचा सामना अर्जें‍टीना संघाशी होऊन तो बरोबरीत सुटला. आज भारतीय हॉकी संघाचा पुढील सामना आयर्लंड शी होणार आहे.   बॅडमिंटन मध्ये भारतीय मानकीत खेळाडू लक्ष्य ...