January 19, 2026 7:14 PM
22
शिवसेना पक्षचिन्हाबाबतच्या वादावर येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होणार
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालचं खंडपीठ सलग दोन दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतही सुनावणी होणार असल्याचं समजतं, असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. २१ आणि २२ जानेवारी या दोन दिवसांत सलग आणि सविस्तर सुनावणी होणार असून, या कालावधीत अन्य कोणतंही प्रकरण न्यायालयाच्या कार्यसूचीत समाविष्ट केलं ज...