January 21, 2025 7:36 PM January 21, 2025 7:36 PM

views 26

छत्रपती संभाजीनगर इथल्या शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी अनेक पदाधिकारी तसंच शिवसैनिकांसोबत आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

October 22, 2024 3:57 PM October 22, 2024 3:57 PM

views 17

भाजपचे नेते निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार

भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होईल अशी माहिती नितेश राणे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. हे सगळं पक्षीय धोरण असल्याचं सांगून  महायुतीच्या फार्म्युल्यानुसार पक्षप्रवेश करत असल्याचं राणे म्हणाले. भारतीय जनता पक्षासोबत आपले नेहमीच चांगले संबंध राहणार असल्याचही त्यांनी  स्पष्ट केल.

October 7, 2024 3:14 PM October 7, 2024 3:14 PM

views 13

बच्चु कडूंना धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिवसेनेच्या वाटेवर

आमदार बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार राजकुमार पटेल हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या १० ऑक्टोबरला मुख्यमंत्री शिंदे मेळघाट दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पटेल यांनी आज दिली. बच्चु कडू यांनी स्थापन केलेल्या तिसऱ्या आघाडीतून आपण विधानसभा निवडणुकीत निवडून येऊ शकणार नाही, त्यामुळे हा निर्णय घेत असल्याचं पटेल यांनी सांगितलं.

June 16, 2024 8:47 PM June 16, 2024 8:47 PM

views 13

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा – मुख्यमंत्री शिंदे

पूर्ण ताकतीनं विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे, निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. पक्षाच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगानं आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक त्यांनी आज मुंबईत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.