January 3, 2025 9:59 AM January 3, 2025 9:59 AM

views 40

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं प्रतिपादन

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचं उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल अहिल्यानगर जिल्हयामध्ये केलं. राहाता तालुक्यातल्या बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी परिसंवादात चौहान बोलत होते. शेतकऱ्यांच्या विकासासाठी मंत्रालयानं सुरू केलेल्या विविध योजनांचा आढावा चौहान यांनी घेतला तसंच कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. लखपती दीदी आ...

December 23, 2024 8:19 PM December 23, 2024 8:19 PM

views 6

येत्या २५ तारखेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नदी जोड प्रकल्पाचा शुभारंभ

येत्या २५ तारखेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नदी जोड प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज पुण्यात ही माहिती दिली. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत, कृषी आर्थिक संशोधन केंद्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात चौहान बोलत होते. कमी पाण्यात अधिकाधिक सिंचन व्यवस्था विकसित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. संपूर्ण जगासाठी भारत हे अन्नधान्याचं कोठार होण्याच्या दृष्टीने सरकार पूर्ण प्रयत्न करत असल्याचं चौहान यांनी सांगितल...

October 21, 2024 4:23 PM October 21, 2024 4:23 PM

views 19

देशातल्या ६ लाख २६ हजार गावांमधल्या जमिनींच्या नोंदी संगणकीकृत केल्याची केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती

केंद्र सरकारने देशभरातल्या ६ लाख २६ हजार गावांमधल्या जमिनींच्या नोंदी संगणकीकृत केल्या असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. नागरी क्षेत्रातल्या जमिनींचं सर्वेक्षण पुनर्सर्वेक्षण करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर नवी दिल्ली इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला ते संबोधित करत होते. भूसंसाधन विभागाने आतापर्यंत जमिनीच्या मालकी हक्काचे निदर्शक असलले १४ कोटी भू आधार क्रमांक वितरित केले असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरी भागातही जिओस्पेशियल तंत्रज्ञा...

September 24, 2024 1:32 PM September 24, 2024 1:32 PM

views 15

कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत शेतकऱी आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केली. आपण जवळपास ५० शेतकरी नेत्यांशी चर्चा करून त्यांचे मुद्दे जाणून घेतल्याचं चौहान यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी  तिचा आत्मा आहेत, असंही ते म्हणाले. शेतकरी नेत्यांनी पिकांचे दर आणि पिक विमा याबद्दल अनेक सूचना केल्याचंही चौहान यांनी  सांगितलं.

September 6, 2024 10:24 AM September 6, 2024 10:24 AM

views 5

आंध्रप्रदेश आणि तेलंगणतील पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध – कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

आंध्रप्रदेशात आलेल्या पुरामुळे अंदाजे दीड लाख हेक्टरहून जास्त क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून, २ लाख शेतकाऱ्यांना फटका बसला आहे असं केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हंटलं आहे. विशेषत: हळद आणि फूल पिकांना अतिवृष्टीची झळ बसल्याचं त्यांनी सांगितलं. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील पूरस्थितीची पाहणी करण्याकरता चौहान कालपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी विजयवाडा, प्रकाशम धरण तसंच कृष्णा नदी लगतच्या पूरग्रस्त शेतांची हवाई पाहणी केली. पंचनामे करण्याची प्रक्रिया सुर...

August 29, 2024 7:56 PM August 29, 2024 7:56 PM

views 11

मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतल्या भारतीय शेतकी संशोधन संस्थेत रोपं लावली

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीतल्या भारतीय शेतकी संशोधन संस्थेत ‘एक पेड मॉ के नाम’ या अभियानाअंतर्गत रोपं लावली. या वेळी त्यांनी सुमारे एक एकर जागेवर मातृवन स्थापन करण्याची योजना असल्याचंही सांगितलं.

July 19, 2024 8:46 PM July 19, 2024 8:46 PM

views 12

शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता उत्पादन वाढवता येऊ शकतं – मंत्री शिवराज सिंह चौहान

शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता उत्पादन वाढवता येऊ शकतं, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्दटलं आहे. लखनौ इथं नैसर्गिक शेतीच्या विज्ञानावरच्या प्रादेशिक सल्लामसलत कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.   केंद्र सरकार नैसर्गिक शेतीसाठी अखिल भारतीय स्तरावरील जनजागृती मोहीम सुरू करणार आहे, सुरुवातीची दोन वर्षे उत्पादन कमी असेल त्यामुळे सरकार नैसर्गिक शेतीसाठी पहिली तीन वर्षे अनुदान देणार असल्याचं सांगत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती सुरू करण्याचे आवाहन त्...

July 12, 2024 12:48 PM July 12, 2024 12:48 PM

views 9

या वर्षीच्या खरीप हंगामात कडधान्य लागवडीच्या क्षेत्रात वाढ

या वर्षीच्या खरीप हंगामात कडधान्य लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्याबद्दल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आनंद व्यक्त केला आहे. नवी दिल्ली इथं खरीप पिकांच्या प्रगतीचा आढावा घेताना ते बोलत होते. तुरीसारख्या कडधान्याच्या लागवडीच्या क्षेत्रात पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे. कडधान्य उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्याला प्राधान्य असेल, असं ते म्हणाले. उडीद, तूर आणि मसूर या सर्व कडधान्यांच्या १०० टक्के खरेदीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध असेल असंही ते यावेळी म्हणाले.