April 26, 2025 11:07 AM April 26, 2025 11:07 AM
16
शिर्डी विमानतळावर 2 हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारायला मान्यता
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारायला तसंच विमानतळाचं विस्तारीकरण, अद्यया वतीकरण करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत काल मान्यता दिली. प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची 91वी बैठक काल सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहात झाली. यावेळी राज्यातल्या विविध विमानतळाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला.