August 4, 2025 1:18 PM August 4, 2025 1:18 PM

views 7

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज नवी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते मूत्रपिंडविकारावर उपचार घेत होते. दीड महिन्यापूर्वी त्यांची प्रकृती अधिक बिघडली होती.    शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक सदस्य होते. दुमका मतदारसंघातून ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. तर दोन वेळा राज्यसभेचे सदस्य होते.    संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते कोळसा मंत्री होते. मात्र ...

August 4, 2025 1:20 PM August 4, 2025 1:20 PM

views 3

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी आपल्या समाज माध्यमावर शोक व्यक्त केला आहे.  सोरेन यांचं निधन हे सामाजिक न्यायाच्या क्षेत्राचं मोठं नुकसान आहे. सोरेन यांनी आदिवासींना ओळख मिळावी म्हणून आणि झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. तर, सोरेन हे आदिवासी समुदाय, गोरगरीब आणि दलितांचं सक्षमीकरण करणारे नेते होते, अशा शोकभावना प्रधानमंत्री...