September 9, 2024 7:40 PM
13
भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात अणुऊर्जा आणि पेट्रोलियमसह विविध क्षेत्रांमधले पाच करार
भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात आज अणुऊर्जा आणि पेट्रोलियमसह विविध क्षेत्रांमधले पाच करार झाले. त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतभेटीवर आलेले अबुधाबीचे युवराज शेख खलिद बिन मोहमद बिन झायद अल नहयान यांच्याशी चर्चा केली. यावेळी भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातले संबध, तसंच नव्यानं पुढे येत असलेल्या क्षेत्रांमधे व्यापक धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत उभय नेत्यांनी विचारविमर्श केला. शेख खलिद काल संध्याकाळीच दिल्लीत पोचले असून प्रधानमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी राजघाट...