December 22, 2025 2:38 PM December 22, 2025 2:38 PM

views 33

‘बांगलादेशात अवामी लीगशिवाय होणारी निवडणूक ही राज्याभिषेक असेल’

बांगलादेशात अवामी लीगशिवाय होणारी निवडणूक ही निवडणूक नसून राज्याभिषेक असेल असं बांगलादेशाच्या पदच्युत प्रधानमंत्री शेख हसीना म्हणाल्या आहेत. एका वृत्त संस्थेला त्या मुलाखत देत होत्या.  मोहम्मद युनुस हे बांगलादेशी नागरिकांच्या पाठिंब्याशिवाय तिथे सत्ता गाजवत असून, आता ते जनतेनं नऊ वेळा निवडून दिलेल्या पक्षावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शेख हसीना यांनी केली. भारत हा बांगलादेशाचा सर्वात घनिष्ट मित्र आणि भागीदार आहे. मात्र, मोहम्मद युनूस हे बांगलादेशात भारताच्या विरोधात लोकभावना भडकवत ...

November 17, 2025 8:46 PM November 17, 2025 8:46 PM

views 80

बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसिना यांना फाशीची शिक्षा, मायदेशात जायला हसिना यांचा नकार

बांगलादेशाच्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधीकरणाने माजी प्रधानमंत्री शेख हसिना यांना आज फाशीची शिक्षा सुनावली. गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या हिंसाचाराबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.   ऑगस्ट २०२४ मधे विद्यार्थी आंदोलकांना मारण्याच्या उद्देशाने बळाचा वापर करण्याचे आदेश हसिना यांनी दिले, असं न्यायाधीकरणाने म्हटलं आहे. गुन्हेगारी कट रचणं, चिथावणी देणं यासह अनेक गुन्ह्यांसाठी हसिना यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. शेख हसीना यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांनाही फाश...

November 18, 2024 9:56 AM November 18, 2024 9:56 AM

views 12

माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी बांगलादेशमधील अंतरिम सरकार करेल – सल्लागार मुहम्मद युनूस

गेल्या ऑगस्टमध्ये सरकार पडल्यानंतर सध्या भारतात आश्रय घेतलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी बांगला देशमधील अंतरिम सरकार करेल, असं बांगलादेशचे विद्यमान मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी म्हटलं आहे. इथल्या अंतरिम सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त ते देशाला संबोधित करत होते. आपलं सरकार सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असंही युनूस म्हणाले.   गेल्या ८ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारलेल्या युनूस यांनी दावा केला की हसीन सरकारच्या विरोधात...

August 5, 2024 7:13 PM August 5, 2024 7:13 PM

views 15

बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांचा राजीनामा

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगला देशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. ढाक्यातलं प्रधानमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान गोनोभवनवर आज शेकडो आंदोलकांनी हल्ला केला. त्यानंतर शेख हसीना देश सोडून लष्कराच्या हेलिकॉप्टरनं सुरक्षित स्थळी निघून गेल्याचं वृत्त आहे. देश चालवण्यासाठी अंतरिम सरकार स्थापन केलं जाईल, असं बांगलादेशाचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी म्हटलं आहे. दूरचित्रवाणी वरून संबोधित करताना त्यांनी देशवासियांना संयम आणि शांतता राखण्याचं आवाहन क...

June 21, 2024 11:29 AM June 21, 2024 11:29 AM

views 16

बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

बांग्लादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना आजपासून दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची त्या भेट घेणार असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत त्यांची द्विपक्षीय बैठक होईल. शेख हसीना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची देखील भेट घेणार आहेत.   नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच परदेशाच्या प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चेसाठी भारतात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नवनिर्वाचित केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठीदेखील शेख हस...