March 27, 2025 1:06 PM March 27, 2025 1:06 PM

views 2

जामिया विद्यापीठ प्रकरणी शरजिल इमाम याची पुढची सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार

जामिया विद्यापीठ हिंसाचार प्रकरणातला आरोपी कार्यकर्ता शरजिल इमाम यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागितलं आहे. इमाम याच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयाने आरोप निश्चितीचे आदेश दिले होते. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका इमाम याने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती.   या याचिकेवर न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या एकलपीठासमोर आज सुनावणी झाली. या याचिकेसंदर्भात उत्तर दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहे. या याचिकेवर पुढच...