March 5, 2025 8:21 PM March 5, 2025 8:21 PM
16
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे ७४० अंकांची वाढ
मेक्सिको आणि कॅनडावर लादलेले शुल्क कमी करण्याचे संकेत अमेरिकेनं दिल्यानं देशातल्या शेअर बाजारांनी आज जोरदार उसळी घेतली. सेन्सेक्स ७४० अंकांची तेजी नोंदवून ७३ हजार ७३० अंकांवर बंद झाला. निफ्टी २५५ अंकांची वाढ नोंदवून २२ हजार ३३७ अंकांवर स्थिरावला. छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या समभागात आज मोठी तेजी झाली.