August 28, 2025 1:44 PM August 28, 2025 1:44 PM

views 12

मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण

गणेश चतुर्थीच्या सुट्टीनंतर आज मुंबई शेअर बाजार उघडताच निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर आयातशुल्क लावल्यामुळे बाजारावर परिणाम झाल्याचं चित्र आहे.   बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये ६२४ अंकांची तर निफ्टीमध्ये १८३ अंकांची घसरण झाली. दुपारी निर्देशांक थोडे सावरले. आज विशेषकरून माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता आणि औषधनिर्माण क्षेत्रांतले समभाग मंदीच्या प्रभावाखाली असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात खरेदीचं वातावरण आहे.

June 6, 2025 7:36 PM June 6, 2025 7:36 PM

views 3

शेअर बाजारात रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा जोरदार परिणाम

रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा जोरदार परिणाम आज शेअर बाजारात दिसून आला. सेन्सेक्स ७४७ अंकांनी वधारुन ८२ हजार १८९ अंकांवर बंद झाला. निफ्टी २५२ अंकांची वाढ नोंदवत २५ हजार ३ अंकांवर स्थिरावला. बँका आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातले समभाग आज तेजीत होते.

May 25, 2025 7:06 PM May 25, 2025 7:06 PM

views 8

भारतीय शेअर बाजारांमधे परदेशी गुंतवणूकदारांची सुमारे १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

भारतीय शेअर बाजारांमधे परदेशी गुंतवणूकदारांनी मे २०२५ मधे आतापर्यंत सुमारे १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अधिकृत आकडेवारी सांगते की, या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी १३ हजार ८३५ रुपये भारतीय समभाग बाजारांमधे गुंतवले मात्र ऋण बाजारातून ७ हजार ७४३ कोटी रुपये काढून घेतले. एप्रिलमधे ४ हजार २२३ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक परदेशातून आली. त्याआधी मार्चमधे ३ हजार ९७३ कोटी रुपये तर फेब्रुवारीमधे ३४ हजार ५७४ कोटी रुपये आणि जानेवारीत ७८ हजार २७ कोटी रुपये परदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले हो...

May 19, 2025 11:31 AM May 19, 2025 11:31 AM

views 22

शेअर बाजारात आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक

मे महिन्यात भारतीय शेअर बाजारात आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक झाली आहे. जागतिक बाजारातलं सकारात्मक वातावरण आणि देशांतर्गत परिस्थितीत झालेली सुधारणा यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 18 हजार 620 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यावर भर दिल्यानंतर एप्रिल महिन्यात पुन्हा गुंतवणुकीचा ओघ वाढण्यास सुरुवात झाली.

May 12, 2025 1:03 PM May 12, 2025 1:03 PM

views 13

भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर आज भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी

भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर आज सकाळी भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक २ हजारांहून अधिक अंकांनी वधारला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ७००हून अधिक अंकांची वाढ दिसून आली.   परकीय गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक आणि जागतिक पातळीवरचे सकारात्मक संकेत यांमुळे ही वाढ दिसून आल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.

May 9, 2025 7:03 PM May 9, 2025 7:03 PM

views 16

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे ८८० अंकाची घसरण

भारत आणि पाकिस्तानधल्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज ८८० अंकाची घसरण झाली, आणि तो ७९  हजार  ४५४ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २६६ अंकांची घसरण नोंदवत  २४ हजार ८ अंकांवर बंद झाला.    स्टील, पोर्ट्स, सिमेंट या क्षेत्रांमध्ये आज घसरण झाली. दक्षिण कोरियाचा कॉस्पी, शांघाया एसएसई कॉम्पोझिट तसंच हाँगकाँगचा हँगसेंग हे आशियाई शेअर बाजारही आज घसरले. जपानच्या निक्कीमध्ये मात्र आज वाढ दिसून आली. 

April 25, 2025 3:36 PM April 25, 2025 3:36 PM

views 3

पहलगाम हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबियांना राष्ट्रीय शेअर बाजाराकडून १ कोटी रुपयांची मदत

पहलगाम दहशदवादी हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबियांना राष्ट्रीय शेअर बाजारानं १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. या कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत करायची तयारी असल्याचं NSE चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान म्हणाले.

March 20, 2025 7:02 PM March 20, 2025 7:02 PM

views 6

देशातले शेअर बाजार महिनाभरातल्या उच्चांकी पातळीवर

सातत्यानं होत असलेल्या तेजीमुळं देशातले शेअर बाजार महिनाभरातल्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. यामुळं गुंतवणुकदारांच्या उत्पन्नात १७ लाख ४३ हजार कोटी रुपयांची वाढ झाली.    गेल्या ४ दिवसात सुरू असलेल्या तेजीमुळे सेन्सेक्स अडीच हजारांनी वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज दिवसअखेर ८९९ अंकांची वाढ नोंदवून ७६ हजार ३४८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २८३ अंकांची वाढ होऊन २३ हजार १९१ अंकांवर बंद झाला. देशातल्या संस्थांत्मक गुंतवणूक दारांनी सुरू ठेवलेली खरेदी यामुळं बा...

March 18, 2025 7:22 PM March 18, 2025 7:22 PM

views 4

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पुन्हा ७५ हजाराच्या पातळीवर

शेअर बाजारात आज खरेदीचा जोर होता. दिवसाच्या सुरुवातीला ४३८ अंकांनी वर गेलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स नंतर काहीसी विक्रीच्या दबावाखाली आल्याचं दिसलं, मात्र नंतर सातत्याने खरेदी झाल्यामुळं निर्देशांक १ हजार २१५ अंकांची झेप घेत ७५ हजारांची पातळी ओलांडून गेला.   दिवसअखेरीस किंचित खाली घसरून कालच्या तुलनेत १ हजार १३१ अंकांची तेजी नोंदवत सेन्सेक्स ७५ हजार ३०१ वर बंद झाला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी कालच्या तुलनेत ३२५ अंकांनी वधारुन २२ हजार ८३४वर बंद झाला.

March 6, 2025 7:42 PM March 6, 2025 7:42 PM

views 12

सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी

सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज ६१० अंकांची वाढ नोंदवून ७४ हजार ३४० अंकांवर बंद झाला. निफ्टी २०७ अंकांची वधारुन २२ हजार ५४५ अंकांवर बंद झाला. मागणीतली मंदी आणि चीनकडून आर्थिक प्रोत्साहन मिळाल्यानं कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली सुधारणा यामुळे ऊर्जा आणि धातू क्षेत्रात वाढ झाली तर डॉलर निर्देशांक कमकुवत होत असताना ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोतल्या वाहन निर्मात्यांवरच्या शुल्काच्या नरमाईच्या भूमिकेनंतर जागतिक बाजारात सकारात्मक संकेत मि...