April 23, 2025 7:33 PM April 23, 2025 7:33 PM
15
शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर ५२१ अंकांची वाढ झाली, आणि तो ८० हजार ११६ अंकांवर बंद झाला. सुमारे ४ महिन्यानंतर हा निर्देशांक पुन्हा ८० हजारांच्या पलीकडे गेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १६२ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ३२९ अंकांवर बंद झाला. सोनं आज तोळ्यामागे अडीच हजार रुपयांनी स्वस्त झालं. मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचे दर सुमारे ९९ हजार रुपये तोळा झाले होते. तर २२ कॅरेट सोनं ९६ हजार ६०० रुपयांच्या आसपास मिळत होत. चांदी आज किलोमागे १ हजार रुपयांनी महाग झाली आणि ९...