July 20, 2024 7:13 PM July 20, 2024 7:13 PM
13
राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने कल असल्याचा शरद पवार यांचा दावा
राज्यात जनतेने ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून जनतेचे प्रश्न सुटले नाहीत. आता जनतेने महाविकासआघाडीकडून अपेक्षा ठेवल्या असून मविआ राज्याला स्थिर सरकार देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाच वर्षांपूर्वी राज्यात काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने ४८ पैकी ३१ खासदार निवडून महाविकास आघाडीला मोठी साथ दिली. या...