September 23, 2024 3:14 PM September 23, 2024 3:14 PM
13
महाराष्ट्रातली जनता आम्हाला साथ देण्याच्या मनःस्थितीत – शरद पवार
राज्यातली जनता आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार , काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांना साथ देण्याच्या मनस्थितीत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ते रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं पत्रकारांशी बोलत होते. हे तिन्ही पक्ष एकत्रित निवडणुकींना सामोरे जाणार आहेत. राज्यात प्रगतीशील पर्याय आम्ही उभा करु. उमेदवार निवडीचा निर्णय एका समितीद्वारे घेतला जात असून त्यावर अखेरचा हात फिरवण्याचं काम सुरु असल्याचं त्यांनी...