November 8, 2024 6:53 PM

views 27

राज्यात आणि देशात महिला सुरक्षित नसून भ्रष्टाचार वाढला आहे – शरद पवार

राज्यात आणि देशात महिला सुरक्षित नसून भ्रष्टाचार वाढला आहे, देशात सध्या मोदी यांची हुकूमशाही सुरू आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. ते आज परभणी जिल्ह्यात सेलू इथं प्रचारसभेत बोलत होते. महविकास आघाडीचं सरकार आल्यावर महिलांना दरमहा तीन हजार रुपये, बसचा मोफत प्रवास, जातनिहाय जनगणना करून ५०टक्के आरक्षणाची मर्यादा काढून आरक्षण, कृषी समृध्दी योजनेत ३ लाखांपर्यंत कर्ज माफी, बेरोजगार तरुणांना ४ हजार रुपये मदत हे निर्णय घेणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. 

November 7, 2024 6:21 PM

views 16

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज ते नागपूर इथे पूर्व नागपूर मतदारसंघाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्या प्रचारसभेत सहभागी झाले. राज्यातल्या जनतेला परिवर्तन हवं आहे, याची आम्हाला जाणीव असून, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं ते यावेळी म्हणाले.   महाराष्ट्रातून उद्योगांचं पलायन झालं असून देशाचे प्रधानमंत्री हे एका राज्याचे, नसून ते सर्व देशाचे असायला हवेत, असं ते यावेळी म्हणाले, आणि मतदारांना महाविकास ...

November 7, 2024 3:55 PM

views 29

शरद पवारांच्या टीका राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही- अजित पवार

शरद पवारांवर खालच्या पातळीवरची वैयक्तिक टीका राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजमाध्यमावर दिला आहे. आमदार सदाभाऊ खोत यांच्या टीप्पणीसंदर्भात हे वक्तव्य चुकीचं आणि अमान्य आहे अशी प्रतिक्रिया देत अजित पवार यांनी त्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

November 7, 2024 3:31 PM

views 17

शरद पवार आज विदर्भाच्या दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रमुख, खासदार शरद पवार आज विदर्भाच्या दौऱ्यावर असून, आज ते पूर्व नागपूर, गोंदिया जिल्ह्यात तिरोडा आणि काटोल विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभांना संबोधित करतील. आज नागपूर इथं आगमन झाल्यावर त्यांनी नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्या प्रचार सभेला संबोधित केलं. महाराष्ट्रातून उद्योगांचं पलायन झालं असून देशाचे प्रधानमंत्री हे एका राज्याचे, नसून ते सर्व देशाचे असायला हवेत. जातीनिहाय जनगणनेची मागणी आम्ही ...

November 6, 2024 3:23 PM

views 18

जीएसटी परिषदेच्या बैठकीला राज्याचे अर्थमंत्री गैरहजर राहतात – शरद पवार

जीएसटी परिषदेच्या बैठकीत राज्याचे अर्थमंत्री उपस्थित राहत नसल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बारामतीमध्ये काल ते व्यापाऱ्यांना संबोधित करत होते. जीएसटी परिषदेच्या बैठकीला राज्याचे अर्थमंत्री सातत्याने गैरहजर राहतात. त्यामुळं राज्याची भूमिका मांडली जात नाही. केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे जीएसटीच्या संदर्भात समस्या घेऊन गेल्यावर त्यांनीही हेच सांगितल्याचं पवार म्हणाले. महाविकास आघाडीत सत्तेत आल्यावर जीएसटीचा प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडू असं आश्वासन त्यांनी दिलं.

November 5, 2024 2:59 PM

views 27

शरद पवार यांचे सक्रीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत

राज्यसभेचा आपला दीड वर्षांचा कार्यकाळ बाकी असून यानंतर पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही, याचा विचार करावा लागेल, असं सांगून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातल्या शिर्सुफळ इथं इथले पक्षाचे विधानसभेचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. राजकारण फक्त निवडणूक आणि सत्तेसाठी नाही, तर लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी करायचं असतं, असं सांगून या भागात विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या ...

November 2, 2024 7:28 PM

views 19

राज्याला सत्ताबदलीची गरज- शरद पवार

  राज्याची सध्याची स्थिती गंभीर असून ती बदलण्यासाठी सत्ताबदलाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राज्याला पूर्वपदावर आणण्याची ताकद असणाऱ्यांना जनतेनं आपला कौल द्यावा आणि ती ताकद फक्त महाविकास आघाडीत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. बारामतीतल्या गोविंद बाग इथं ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात परिवर्तन आणण्याचा आणि राज्याच्या नागरिकांच्या जीवनात सुधारणा करण्याचा निर्धार आज पाडव्याच्या दिवशी करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.    प्रधानमंत्र...

October 24, 2024 7:45 PM

views 40

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी आज जाहीर झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे इथे वार्ताहर परिषदेत ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली. बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इस्लामपूरमधून जयंत पाटील, तासगाव कवठे महांकाळ इथून रोहित पाटील तर अहेरीमधून भाग्यश्री अत्राम निवडणूक लढवणार आहेत. घनसावंगीतून राजेश टोपे, काटोलमधून अनिल देशमुख, कोरेगावमधून शशिकांत शिंदे यांची नावं उमेदवार यादीत आहेत. मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड...

October 15, 2024 4:27 PM

views 29

मविआचे ३१ खासदार निवडून आल्यानंतर सरकारला लाडकी बहिण आठवली – शरद पवार

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आल्यानंतर महायुती सरकारला लाडकी बहीण आठवली, अशी उपरोधिक टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं आयोजित मेळाव्यात ते काल बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर आणि फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

October 5, 2024 9:21 AM

views 26

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांवर नेण्याची शरद पवार यांची मागणी

केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांवर नेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे. ते काल सांगली इथं पत्रकारांशी बोलत होते. यासाठी संसदेत सरकारने विधेयक आणल्यास आपण पाठिंबा देऊ, असं पवार यांनी सांगितल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.