November 24, 2024 6:54 PM November 24, 2024 6:54 PM

views 19

पराभवाची कारणं शोधून पुन्हा नव्या दमानं उभं राहण्याचा शरद पवार यांचा निर्धार

पराभवाची कारणं शोधून पुन्हा नव्या दमानं उभं राहू, नव्या पिढीला उभं करणं हा आपला कार्यक्रम राहील, असं ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते आज सातारा जिल्ह्यात कराड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.   महायुतीनं लोकांसमोर प्रभावीपणे त्यांचा कार्यक्रम मांडला, आपल्याकडून प्रचारात कमतरता राहिल्याचं पवार म्हणाले. ओबीसी मतदार महाविकास आघाडीच्या विरोधात गेले का, या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, मंडल आयोगाची अंमलबजावणी आपल्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात झाली. त्...

November 18, 2024 7:09 PM November 18, 2024 7:09 PM

views 12

संविधान बदलणं हा भाजपाचा हेतू – शरद पवार

संविधान बदलणं हा भाजपाचा हेतू असून, संविधानाला धक्का लागला तर नागरिकांचे मूलभूत अधिकार धोक्यात येतील, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज बारामती इथं विधानसभा निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत बोलत होते.    आपल्या सत्ताकाळात आपण कारखाने, एमआयडीसी उभारून हजारो रोजगार निर्माण केले. मात्र महायुती सरकारच्या काळात राज्यात येऊ घातलेले उद्योग गुजरातला नेण्यात आले असा आरोप पवार यांनी केला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं.   महायुती सरकारला निवडणुकीच्या त...

November 16, 2024 5:32 PM November 16, 2024 5:32 PM

views 12

भाजपा नेत्यांकडून धर्माचा वापर करून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न-शरद पवार

भाजपा नेत्यांकडून धर्माचा वापर करून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. देवेंद्र फडनवीस यांनी या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला, निवडणुकीत यश मिळणार नाही, याची खात्री झाल्यामुळेच भाजपा नेते असं करत आहेत, असं पवार म्हणाले.

November 15, 2024 6:47 PM November 15, 2024 6:47 PM

views 12

राज्यात सत्तेत बदल करण्याशिवाय पर्याय नाही – शरद पवार

राज्यात ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांचा अनुभव चांगला नसल्यानं सत्तेत बदल करण्याशिवाय पर्याय नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते. सत्ता बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा, असं आवाहन त्यांनी केलं.

November 13, 2024 7:29 PM November 13, 2024 7:29 PM

views 14

विद्यमान सरकार महिलांवर अन्याय करत असल्याची शरद पवारांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यात राहता, आणि वांबोरी इथं प्रचार सभा घेतल्या. लोकशाहीतही काही शक्ती दडपशाहीचा वापर करुन लोकभावनांशी खेळत असतील तर त्यांना मतपेटीच्या माध्यमातून धडा शिकवा, असं  आवाहन त्यांनी केलं. विद्यमान सरकार महिलांचा जाहीर अवमान करुन त्यांच्यावर अन्याय करत असल्याची टीका पवार यांनी केली.

November 13, 2024 7:12 PM November 13, 2024 7:12 PM

views 13

अजित पवार यांच्या पक्षाने निवडणुकीसाठी शरद पवारांच्या नावावर अवलंबून राहू नये – सर्वोच्च न्यायालय

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहिरातीत संस्थापक शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख वारंवार का केला जातो अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या पक्षाकडे केली आहे. अजित पवार यांच्या पक्षाने निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावावर अवलंबून राहू नये असा सल्लाही न्यायालयानं दिला.

November 12, 2024 6:54 PM November 12, 2024 6:54 PM

views 12

सत्ताधाऱ्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नसल्याची शरद पवार यांची टीका

सत्ताधाऱ्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नसल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे, त्यांनी आज नाशिक जिल्ह्यात कळवण, दिंडोरी, निफाड इथं प्रचार सभा घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते. कांद्याचा भाव वाढला की सरकार निर्यातबंदीचा विचार करून कांद्याचे भाव पाडतं, शेतकरी कर्जबाजारी हाेतात, त्यांना कर्जमाफी मिळत नाही मात्र, १६ उद्योगपतींचं १४ हजार कोटी रूपयांचं कर्ज माफ केलं, असं पवार म्हणाले.  दिंडोरी इथं सभेत त्यांनी, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे विश्वासघाती असल्याचा आरोप केला.

November 11, 2024 7:09 PM November 11, 2024 7:09 PM

views 13

शरद पवारांची भाजपावर टीका

लोकसभा निवडणुकीत भाजपानं ४०० हून अधिक जागा मिळवण्याचा निर्धार केला होता, तो पूर्ण झाला असता तर संविधान बदलण्याचा धोका निर्माण होऊ शकला असता, मात्र जनतेच्या जागरूकतेमुळे हे घडलं नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते जळगाव इथं प्रचारसभेत बोलत होते. भारतीय घटनेच्या संरक्षणासाठी सावधान राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले.    देशातल्या शेतकऱ्यांच्या स्थितीवरही शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. एका वर्षात ९०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही, असं...

November 10, 2024 6:42 PM November 10, 2024 6:42 PM

views 13

मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली – शरद पवार

लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदारांनी स्पष्ट कौल न दिल्यानं मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी लाडकी बहीण सारखी योजना आणली, असं मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. ते आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. भाजपाच्या नेतृत्वाखालचं सरकार संविधानाला धक्का पोहोचवेल अशी भिती लोकसभा निवडणुकीवेळी मतदारांमध्ये होती, ती अजूनही संपलेली नाही, त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसून येईल, असंही पवार म्हणाले.   धाराशिव जिल्ह्यातल्या भूम परांडा विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांनी प्रचारस...

November 9, 2024 4:49 PM November 9, 2024 4:49 PM

views 15

शरद पवार यांनी आज हिंगोली इथं प्रचारसभेला संबोधित केलं

महाराष्ट्रात यावेळी निवडणूक लढवणाऱ्या पक्षांची आणि उमेदवारांची संख्या जास्त असून त्यामुळे उमेदवारांचा कस लागणार असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. आज एका वृत्तवाहिनीला ते मुलाखत देत होते. शरद पवार यांनी हिंगोली इथं प्रचारसभेला संबोधित केलं. तसंच ते आज बीडमध्ये परळी आणि आष्टी इथं सभांना संबोधित करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे यवतमाळ इथं प्रचारसभा घेणार आहेत.