November 27, 2025 3:49 PM November 27, 2025 3:49 PM

views 21

महायुतीमध्ये निधी देण्यावरून चढाओढ, शरद पवारांचा आरोप

महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये निधी देण्यावरून चढाओढ लागली आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केला. बारामती इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. हल्ली कामावर मतं मागितली जात नाहीत, तर पैसे देऊन, निधी देऊ अशी आश्वासनं दिली जातात. ही चांगली गोष्ट नाही. अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या, हाच दृष्टिकोन असेल, तर त्यावर भाष्य न केलेलं बरं, असं पवार म्हणाले. राज्य सरकारनं कर्जवसुलीला एका वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी ठरेल, पण शेतकऱ्यांचं झालेलं आर्थिक नुकसान पाहता त्यातली काही र...

June 17, 2025 6:16 PM June 17, 2025 6:16 PM

views 15

सत्तेसाठी भाजपासोबत जाणाऱ्यांचा विचार न करता नेतृत्वाची नवी फळी तयार करु – शरद पवार

सत्तेसाठी भाजपासोबत जाणाऱ्यांचा विचार न करता नेतृत्वाची नवी फळी तयार करु, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज  पिंपरी चिंचवड इथं पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. कुणाशीही संबंध ठेवू, पण भाजपाशी संबंधित असलेले लोक काँग्रेसच्या विचारांचे असू शकत नाहीत. त्यामुळे अशा संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही”, असं ते म्हणाले.    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आपण सगळ्या जागा लढवू, आपल्या सोबत जो कोणी, महिला, तरुण येत असेल त्यांचं स्वागत आहे. आपण त्य...

June 10, 2025 3:53 PM June 10, 2025 3:53 PM

views 45

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पदाचा राजीनामा देण्याची तयारी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी अशी विनंती त्यांनी केली. पुण्यात आयोजित पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. सात वर्षांपासून ते प्रदेशाध्यक्ष आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा. राज्य चालवणारं नवीन नेतृत्व निर्माण करण्यासाठी काम करा असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी उपस्थितांना केलं.

March 15, 2025 4:01 PM March 15, 2025 4:01 PM

views 28

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धोरण आखायला हवं – ज्येष्ठ नेते शरद पवार

मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धोरण आखायला हवं असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. २०२४ मधे राज्यात २ हजार ६३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्य मदत आणि पुनर्वसन विभागाने जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी बारामती इथं वार्ताहरांशी बोलताना हे आवाहन केलं. शेतीमधे क्रांती होत आहे, ऊस लागवडीसाठी लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल असं पवार म्हणाले.

January 20, 2025 7:44 PM January 20, 2025 7:44 PM

views 12

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शरद पवार यांच्या निवासस्थानी आज भेट झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात यावेळी चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. या भेटी दरम्यान काँग्रेसचे पदाधिकारी नसल्याने त्यांच्याशीही चर्चा करू, असंही पाटील म्हणाले.

January 14, 2025 8:52 PM January 14, 2025 8:52 PM

views 4

राजकीय नेत्यांमधे पूर्वी असलेला सुसंवाद उरला नसल्याची खंत-शरद पवार

राजकीय नेत्यांमधे पूर्वी असलेला सुसंवाद आता उरला नसल्याची खंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिर्डी इथं शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. देशाच्या गृहमंत्र्यांनी भाषण करताना थोडीफार माहिती घेऊन बोललं पाहिजे. १९७८ साली मी मुख्यमंत्री असताना त्यात जनसंघाचे नेते मंत्रिमंडळात होते. नंतरच्या काळातही वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधल्या नेत्यांमधे सुसंवाद होता. ते अतिरेकी भूमिका घेऊन समाजक...

January 9, 2025 3:19 PM January 9, 2025 3:19 PM

views 13

सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू- शरद पवार

आपला पक्ष सत्तेत जाणार या अफवा असून सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल स्पष्ट केलं. मुंबईत झालेल्या पक्षपदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.   पुढच्या पंधरा दिवसात पक्षात मोठे बदल पाहायला मिळतील,असंही ते म्हणाले. राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे, या निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणूनच आपण सामोरे जाऊ, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

January 5, 2025 7:25 PM January 5, 2025 7:25 PM

views 13

शेती क्षेत्रात उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची गरज – शरद पवार

'शेती क्षेत्रात उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची गरज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरीनं आयोजित केलेल्या कृषी आणि पशुधन प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यानं घडलेले बदल शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात दाखवण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.    'कोकणात मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, फळबागा, अन्नधान्य, डाळी या सगळ्यासाठी प्रचंड संधी आहेत. त्या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली, तर कोकणाचा चेहरा ...

December 8, 2024 7:04 PM December 8, 2024 7:04 PM

views 19

‘मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ग्रामस्थांच्या निर्णयावर आक्षेप घेण्याचं कारण नाही’

मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून चर्चेत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गावाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार उत्तम जानकर हे देखील उपस्थित होते. मारकडवाडी ग्रामस्थांनी स्वतःच्या मतांची पडताळणी करण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यास त्‍यावर प्रशासनानं आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही, असंही ते म्हणाले. मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी गावोगावी ठराव घेण्याची सूचना त्यांनी दिली. लोकशाही टिकविण्यासाठी ईव्हीएम मशीन नको ही चळवळ अधिक तीव्र कर...

November 30, 2024 1:34 PM November 30, 2024 1:34 PM

views 10

संसदेत विरोधी पक्षाच्या मागण्या स्वीकारल्या जात नसल्यामुळे संसदीय लोकशाहीचं पालन होत नसल्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची टीका

संसदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या मागण्या स्वीकारल्या जात नाहीत, याचा अर्थ देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नाहीय, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. हे योग्य नसून यासाठी लोकांमध्ये जाऊन जागृती घडवून आणण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. निवडणुकीच्या निकालानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली असून देशात हे प्रथमक घडत असल्याचं पवार म्हणाले. मतदान यंत्राबद्दल काही शंका आहेत, मात्र याबद्दल ठोस पुरावा नाही. काही जणांनी पुनर्मोजणीची मागणी केल...