August 9, 2024 10:33 AM August 9, 2024 10:33 AM
11
यवतमाळच्या डॉ.विवेक पोलशेट्टीवार यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर
यवतमाळच्या मुकूटबन इथल्या डॉ विवेक पोलशेट्टीवार यांना रसायनशास्त्रातील योगदानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 23 ऑगस्टला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. डॉ पोलशेट्टीवार सध्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये प्रोफेसर आहेत. हवेतील कार्बनचे घटक वेगळे करून त्याचे उपयोगी घटकात रुपांतर करण्याबाबत त्यांनी संशोधन केलं आहे. प्रदुषण मुक्तीच्या दिशेने टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. हवामान बदल, जागतिक तापमान वाढ या विषयावर पोलशेट्टीवार सं...