October 18, 2025 2:27 PM
50
महाराष्ट्र नौदल क्षेत्राचा पदभार रिअर अॅडमिरल शंतनू झा यांनी स्वीकारला
महाराष्ट्र नौदल क्षेत्राचा पदभार रिअर अॅडमिरल शंतनू झा यांनी स्वीकारला आहे. आयएनएस कुंजली इथं काल झालेल्या समारंभात रिअर अॅडमिरल अनिल जग्गी यांच्याकडून झा यांनी पदभार स्वीकारला. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पदवीधर असलेले शंतनू झा यांची १ जुलै १९९३ रोजी भारतीय नौदलात नियुक्ती झाली. आय एन एस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवर त्यांनी कार्यकारी अधिकारी पद सांभाळले असून नौकानयनशास्त्र आणि दिशादर्शन यात झा तज्ञ आहेत. नौसेना पदक हा महत्वपूर्ण सन्मान शंतनू झा यांना प्राप्त झाला आहे.