June 27, 2025 10:59 AM June 27, 2025 10:59 AM
7
शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला भारताचा नकार
चीनच्या किंगदाओ इथं झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला नकार दिला आहे. घोषणापत्रात सीमापार दहशतवादी कारवायांचा उल्लेख नसल्यानं भारतानं नाराजी व्यक्त करत स्वाक्षरी करण्यास नकार दिला. दहशतवाद, कट्टरतावाद आणि अतिरेकी कारवाया हे प्रादेशिक शांतता आणि परस्पर विश्वासासाठी सर्वात मोठे धोके असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीत सांगितलं. दहशतवाद, आणि शांती-समृद्धी एकत्र नांदू शकत नाहीत, हे लक्षात घेऊनच भारतानं स...