March 12, 2025 7:06 PM March 12, 2025 7:06 PM
18
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुंबईत आंदोलन
राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी करत १२ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन केलं. महामार्ग रद्द न केल्यास मोजणी अडवण्यात येईल, तसंच, प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढण्यात येतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. विरोधी पक्षातले अनेक नेते यावेळी उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र लादायचा नाही. या महामार्...