February 22, 2025 8:13 PM February 22, 2025 8:13 PM
11
शक्तीकांत दास यांची प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दास हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. शक्तिकांत दास हे प्रधानमंत्र्यांचे दुसरे प्रधान सचिव असतील. त्यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली होती. दास हे तामिळनाडू कॅडरचे १९८० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.