October 4, 2025 8:11 PM October 4, 2025 8:11 PM
334
ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेलं शक्ती चक्रीवादळ शक्तिशाली होण्याची शक्यता
ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या दरम्यान, समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्यामुळे पुढचे काही दिवस मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.