September 2, 2024 3:42 PM September 2, 2024 3:42 PM

views 17

शक्ती कायदा तातडीनं मंजूर करण्याची अनिल देशमुख यांची मागणी

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असलेला शक्ती कायदा तातडीनं मंजूर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी केली आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. या मागणीसाठी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महिला आघाडी आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधिमंडळानं संमत केलेला हा कायदा तीन वर्षांपासून केंद्र सरकारकडं मान्यतेसाठी पडून आहे. तो केंद्राने लवकरात लवकर मंजूर करून राज्यात ...