August 26, 2024 3:51 PM August 26, 2024 3:51 PM

views 12

कल्याण इथं दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

कल्याण इथं दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडिता आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. दोन दिवसांपूर्वी पीडिता आरोपीच्या घरात खेळायला गेलेली असताना त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी धर्मेंद्र यादव याला अटक केली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने यादव याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.