August 21, 2024 3:26 PM August 21, 2024 3:26 PM
18
बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा राज्यात विविध ठिकाणी निषेध
बदलापूर इथं दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद आज राज्यात विविध ठिकाणी उमटत आहेत. राज्यात ठिकठिकाणी निदर्शन, आंदोलन केली जात आहेत. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आणि राज्य सरकारच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट इथं आज निदर्शनं केली. राज्यपालांनी राज्य सरकार बरखास्त करावं, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली. ज्या शिक्षण संस्थेत ही घटना घडली त्याच्या पदाधिकाऱ्यांवर तसंच य...