August 21, 2024 7:03 PM August 21, 2024 7:03 PM

views 15

बदलापूर इथं कालच्या आंदोलनानंतर परिस्थिती सुरळीत

बदलापूर इथं दोन लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी काल झालेल्या आंदोलनानंतर या भागातली परिस्थिती आणि रेल्वे वाहतूक सुरळीत असून अफवा पसरू नयेत, यासाठी काही दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे. बदलापूर आणि परिसरातल्या शाळा आज बंद आहेत.  रेल रोको आंदोलन करणाऱ्या ३०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २८ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यापैकी २२ जणांना न्यायालयानं १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर ब...

August 21, 2024 8:32 AM August 21, 2024 8:32 AM

views 15

बदलापूर लैंगिक अत्याचार तपास प्रकरणी एसआयटीची स्थापना

ठाणे जिल्ह्यात बदलापूर मधल्या आदर्श महाविद्यालयात दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आलं आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून, मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. तसंच संस्थाचालकांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच याप्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकांची देखील तत्काळ बदली करण्यात आली आहे.   दरम्यान, या प्रकरणी आरोपीला कडक शासन करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. अ...

August 20, 2024 7:01 PM August 20, 2024 7:01 PM

views 8

बदलापूर इथं २ शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी संतप्त नागरिकांचं रेल्वे रोको आंदोलन

बदलापूर इथल्या एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांनी  बदलापूर रेल्वेस्थानकात रेल्वे रोको आंदोलन केलं. या घटनेतल्या अपराध्याला फाशी देण्याची मागणी जमाव करीत होता. सकाळपासून सुरु झालेल्या या आंदोलनाला दुपारी हिंसक वळण लागलं. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला तेव्हा जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. अखेर अधिक कुमक मागवून जमावाला पांगवण्यात आलं. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक केली असून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे निर्देश पोलिसां...