September 21, 2025 4:10 PM September 21, 2025 4:10 PM
11
सेवा पर्वाअंतर्गत ‘नमो युवा रन’ उपक्रमाचं देशभरात आयोजन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त सुरु करण्यात आलेल्या ‘सेवा पर्वा’ अंतर्गत ‘नमो युवा रन’ हा उपक्रम देशभरात विविध ठिकाणी राबवला जात आहे. या उपक्रमामध्ये युवक-युवती मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत. ‘अमली पदार्थ मुक्त देशाच्या निर्मितीच्या सामूहिक मोहिमेमध्ये देशातल्या युवकांची शक्ती, ऊर्जा आणि दृढनिश्चय याचा उपयोग करणं’, हे या कार्यक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राजभूषण चौधरी आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांनी आज नवी दिल्ली इथं ‘नमो युवा रन’ क...