November 25, 2024 8:03 PM

views 37

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अदानी प्रकरणावरुन गदारोळ

संसदेचं हिवाळी अधिवेशन आज सुरु झालं. पहिल्याच दिवशी अदानी उद्योग समूहाच्या कथित लाचखोरी प्रकरणावरून गदारोळ झाल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.    लोकसभेत सुरुवातीला वसंतराव चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण आणि इतर दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहून कामकाज काही काळ तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कथित लाचखोरी प्रकरणाबरोबरच, उत्तर प्रदेशातल्या संभल इथल्या हिंसाचार प्रकरणावरून गदारोळ केल्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहा...