December 9, 2025 7:11 PM December 9, 2025 7:11 PM

views 65

तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणाऱ्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी

तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणारं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. यामुळं सर्व जमीन धारकांची नावं सात बाऱ्यावर येतील आणि लहान भूखंडाची खरेदी विक्री सुलभ होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.    या नवीन विधेयकामुळे आता विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा मंजूर असलेल्या क्षेत्रात वेगळ्या 'एनए' परवानगीची गरज भासणार नाही. त्याऐवजी 'एक वेळचे अधिमूल्य'  भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, असं या विधेयकात स्पष्ट करण्यात आले आहे.   सार्वजनिक विश्वस्त कायद्यात बद...