May 13, 2025 7:29 PM

views 11

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे १ हजार २८२ अंकाची घसरण

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १ हजार २८२  अंकाची म्हणजेच  सुमारे दीड  टक्क्यांची  घसरण  नोंदवत ८१ हजार १४८ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील  ३४६ अंकांनी घसरून २४ हजार ५७८ अंकावर बंद झाला. मात्र मुंबई शेअर बाजारात एकंदर सकारात्मक चित्र दिसून आलं. आज २ हजार ५५९ कंपन्यांचे शेअर्स वधारले. १ हजार ४०२ कंपन्यांचे शेअर्स घसरले आणि १४० कंपन्यांचे शेअर्स कायम राहिले. राष्ट्रीय शेअर बाजारात ४३ कंपन्यांनी ५२ आठवड्यांचा उच्चांक , तर १० कंपन्यांनी ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला.

April 7, 2025 6:52 PM

views 14

अमेरिकेनं वाढवलेल्या करांमुळं जगभरातल्या शेअर बाजारात हाहाकार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेल्या करांमुळे जगभरातल्या शेअर बाजारांसह भारतीय बाजारातही आज हाहाकार माजला. गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यादिवसानंतरची सर्वात मोठी घसरण आज देशातल्या शेअर बाजारांनी नोंदवली. यामुळे देशातल्या गुंतवणूकदारांचं साडे १३ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं.    दिवसअखेर सेन्सेक्स २ हजार २२७ अंकांनी घसरुन ७३ हजार १३८ अंकांवर बंद झाला. निफ्टी ७४३ अंकांची घट नोंदवून २२ हजार १६२ अंकांवर स्थिरावला. सत्रादरम्यान सेन्सेक्स सुमारे ४ ह...

April 7, 2025 9:03 PM

views 13

अमेरिकेनं वाढवलेल्या करांमुळं जगभरातल्या शेअर बाजारात हाहाकार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेल्या करांमुळे जगभरातल्या शेअर बाजारांसह भारतीय बाजारातही आज हाहाकार माजला. गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यादिवसानंतरची सर्वात मोठी घसरण आज देशातल्या शेअर बाजारांनी नोंदवली. यामुळे देशातल्या गुंतवणूकदारांचं साडे १३ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं.    दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २ हजार २२७ अंकांनी घसरुन ७३ हजार १३८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७४३ अंकांची घट नोंदवून २२ हजार १६२ अंकांवर ...

January 13, 2025 8:55 PM

views 9

देशातल्या दोन्ही शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण

गेल्या आठवड्यापासून देशातल्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आजही कायम होती. जागतिक आणि स्थानिक कारणांमुळं देशातले दोन्ही शेअर बाजार घसरले. दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ४९ अंकांनी कोसळून ७६ हजार ३३० अंकांवर बंद झाला. निफ्टी ३४६ अंकांनी घसरला आणि २३ हजार ८६ अंकांवर स्थिरावला. व्यवहाराच्या दरम्यान निफ्टी २३ हजारांची पातळीही मोडणार अशी शक्यता निर्माण झाली होती.    अमेरिकेत बेरोजगारीचे प्रमाण कमी झाल्यानं व्याजदर कपातीची शक्यता कमी झाली. कच्चा तेलाचे वाढलेले दर, डॉलरच्या तुलनेत घसरत असलेला रुपया, प...

October 28, 2024 7:08 PM

views 25

शेअर बाजार पुन्हा तेजीत, सेन्सेक्समधे ६०३, तर निफ्टीत १५८ अंकांची वाढ

पाच दिवसांच्या मंदीनंतर आज देशातला शेअर बाजार तेजीत बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज ६०३ अंकांची वाढ झाली आणि तो ८० हजार ५ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५८ अंकांची वाढ होऊन तो २४ हजार ३३९ अंकांवर बंद झाला. बँक, वस्तू, दूरसंवाद, आरोग्य क्षेत्रातल्या कंपन्यांना या तेजीचा फायदा झाला.

September 19, 2024 7:26 PM

views 14

अमेरिकी फेडरल रिझर्व्हनं व्याजदर कपातीची घोषणा केल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीचा विक्रमी पातळीला स्पर्श

अमेरिकी फेडरल रिझर्व्हनं व्याजदर कपातीची घोषणा केल्यानंतर आज देशातल्या शेअर बाजारातल्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी विक्रमी पातळीला स्पर्श केला. सेन्सेक्सनं आज सकाळच्या सत्रात ८३ हजार ७७४ आणि निफ्टीनं २५ हजार ६१२ या पातळीला स्पर्श केला. पण त्यानंतर दोन्ही शेअर बाजारात घसरण सुरू झाली. दिवसअखेर सेन्सेक्स २३७ अंकांची वाढ नोंदवून ८३ हजार १८५ अंकांवर बंद झाला. निफ्टीनं ३८ अंकांची वाढ नोंदवली आणि हा निर्देशांक २५ हजार ४१६ अंकांवर स्थिरावला. फेडरल रिझर्व्हनं काल ४ वर्षानंतर पहिल्यांच व्याजदरात कपात के...

August 6, 2024 7:15 PM

views 7

शेअर बाजारात घसरण सुरुच

जपानच्या निक्केई या शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा थेट परिणाम काल भारतीय शेअर बाजारावर झाला होता. आजही संपूर्ण दिवसभरात शेअर बाजारात घसरण सुरू राहिली.  मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज १६६ अंकांची घसरण झाली आणि तो ७८ हजार ५९३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ६३ अंकांची घसरण नोंदवत २३ हजार ९९३ अंकांवर बंद झाला.

July 19, 2024 2:50 PM

views 16

मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्सचा ८१ हजार ५८८ अंकांचा नवा उच्चांक

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज सुरुवातीच्या सत्रात ८१ हजार ५८८ अंकांचा नवा विक्रमी उच्चांक नोंदवला, मात्र जागतिक बाजारातल्या कमकुवत स्थितीच्या पार्श्वभूमीवर तो १६७ अंकांनी घसरला आणि ८१ हजार १७७ अंकांवर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं देखील सुरुवातीच्या सत्रात २४ हजार ८५५ अंकांचा नवा उच्चांक नोंदवला, मात्र त्यानंतर तो ७३ अंकांनी कमकुवत होत २४ हजार ७२८ अंकांवर घसरला.

July 16, 2024 2:52 PM

views 22

मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्समध्ये आज विक्रमी वाढ

मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्स या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात विक्रमी वाढ झाली. सुरवातीला २३० अंकांची वाढ नोंदवत ८० हजार ९०० अंकांवर पोचला आणि तिसऱ्या सत्रात निर्देशांक ८० हजार ७३२ वर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सकाळच्या सत्रात वाढ बघायला मिळाली. निफ्टीतही सुरवातीला ७४ अंकांची वाढ झाली आणि तो २४ हजार ६१६ वर पोचला.  

June 27, 2024 1:17 PM

views 29

शेअर बाजारात दिवसाच्या सुरवातीलाच उत्साह, सेन्सेक्स प्रथमच ७९ हजाराच्या पार

भारतीय शेअर बाजारांमधे आज दिवसाच्या सुरुवातीलाच तेजीचं वातावरण दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सने आज पहिल्यांदाच ७९ हजार अंकांची पातळी ओलांडली, तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी २३ हजार ८८१ अंकांच्या पुढे गेला. सुरुवातीला नफावसुलीमुळे शेअर बाजारात काही काळ निरुत्साह दिसत होता, पण त्यानंतर पुन्हा खरेदीला जोर आल्यामुळे शेअर बाजार विक्रमी अंकांवर पोहोचले.