June 16, 2025 12:46 PM June 16, 2025 12:46 PM

views 14

ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुलकर्णी यांचं निधन

ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते.  आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या मराठा मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. त्यानंतर मिड डे या इंग्रजी वृत्तपत्रात त्यांनी दीर्घकाळ काम केलं. साप्ताहिक विवेक आणि धर्मभास्कर या मासिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काही काल काम केलं. हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेच्या मुंबई कार्यालयाचे ते काही काळ प्रमुख होते.