October 5, 2024 10:51 AM October 5, 2024 10:51 AM
14
जगाच्या विविध भागांमध्ये लवकरच सुरू होणार भारताचे पाच सेमीकंडक्टर प्लांट
जगाच्या विविध भागांमध्ये भारताचे पाच सेमीकंडक्टर प्लांट लवकरच सुरू होणार असून येत्या काही काळात भारतीय बनावटीच्या चिप्स जगाला उपलब्ध होतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. दिल्लीत झालेल्या कौटिल्य आर्थिक परिषदेला ते काल संबोधित करत होते. भारताचे स्थान मोबाईल आयातदार ते मोबाईल उत्पादक असे बदललं असून प्रत्येक क्षेत्रात गुंतवणुकीच्या भरपूर संधी असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. भारत वेगाने वृद्धिंगत होणारी जगातली पाचवी अर्थव्यवस्था असल्याचे अधोरेखित करुन...