October 5, 2025 1:20 PM

views 23

भुवनेश्वर इथं नमो सेमिकंडक्टर प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता

भुवनेश्वर इथं नमो सेमिकंडक्टर प्रयोगशाळा उभारण्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे. या प्रयोगशाळेसाठी  ४ कोटी ९५ लाख रुपये खर्च येणार आहे. सेमिकंडक्टर प्रशिक्षण, रचना आणि निर्मितीसाठी आवश्यक उपकरणं या प्रयोगशाळेत असतील.

August 12, 2025 7:48 PM

views 15

चार नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळानं आज ओदिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेशातल्या ४ हजार ५९४ कोटी रुपयांच्या चार नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला.   सेमिकंटक्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रासाठी सरकार एक बळकट परिसंस्था तयार करत आहे, असं वैष्णव यावेळी म्हणाले. गेल्या अकरा वर्षात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सहा टक्के वाढ झाली असून निर्य...