August 22, 2024 8:50 AM August 22, 2024 8:50 AM
8
राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मुंबईतील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे
महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार रोखण्याच्या दृष्टीनं राज्यातल्या सगळ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मुंबई उपनगरमधल्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये, पुढच्या महिन्यापासून स्व-संरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल मुंबईत एका समारंभात ही माहिती दिली. शाळा आणि महाविद्यालयांमधल्या महिला शौचालयांमध्ये महिला कर्मचारीच नियुक्त करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचंही लोढा यांनी यावेळी सांगितलं