December 18, 2025 1:33 PM December 18, 2025 1:33 PM
7
‘सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल २०२५’ लोकसभेत सादर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत ‘सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल २०२५’ सादर केलं. भारतीय शेअर बाजाराशी संबंधित सर्व कायद्यांचं एकत्रीकरण करून त्यामध्ये सुधारणा करणं, हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. हे विधेयक पुढल्या छाननीसाठी आर्थिक विषयावरच्या संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव सीतारामन यांनी मांडला. विधेयक मांडण्यापूर्वी काँग्रेसचे मनीष तिवारी आणि द्रमुकचे अरुण नेहरू यांनी विधेयक मांडायला विरोध केला होता. आदिवासी समाजाच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी द...