August 12, 2024 3:23 PM
12
हिंडेनबर्गने केलेले आरोप सेबीने फेटाळले
हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप सेबी म्हणजे भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं फेटाळले असून या पार्श्वभूमीवर शांत चित्ताने प्रतिक्रिया द्यावी, असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं आहे. हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. हितसंबंधांमुळे निर्माण होणारे पेचप्रसंग हाताळण्यासाठी सेबीकडे पुरेसे नियम आणि सक्षम अंतर्गत यंत्रणा असल्याचं सेबीने म्हटलं आहे. वैयक्तिक मालकीचे समभाग, आणि इतर मुद्द्यांवर सेबी अध्यक्षांनी वेळोवेळी जाहीर खुलासे केले असून, हितसंबंधांचा पेच उद्भवेल अशा प्रकरणांमधून नेहमीच ...