March 1, 2025 7:02 PM March 1, 2025 7:02 PM
8
सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार तुहिन कांत पांडे यांनी स्वीकारला
सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार तुहिन कांत पांडे यांनी आज मुंबईत स्वीकारला. देशाच्या नागरिकांचा, संसदेचा, सरकारचा, गुंतवणूकदारांचा आणि या क्षेत्राचा सेबीवर विश्वास आहे, असं ते यावेळी माध्यमांशी बोलताना केलं. विश्वास, पारदर्शकता, परस्परसंबंध आणि तंत्रज्ञान या चार गोष्टी समोर ठेवून सेबी काम करते आणि म्हणूनच भारतीय बाजारपेठेवर संपूर्ण जगाचं लक्ष आहे, असं त्यांनी नमूद केलं.