November 8, 2025 5:19 PM November 8, 2025 5:19 PM
43
सेबीच्या गुंतवणूकदारांना सूचना!
ऑनलाइन मंचांवर उपलब्ध असलेल्या आणि कोणतंही नियमन नसलेल्या सोन्याच्या उत्पदनांमध्ये गुंतवणूक करू नये, अशा सूचना सेबीनं गुंतवणूकदारांना दिल्या आहेत. काही डिजिटल आणि ऑनलाइन मंच प्रत्यक्ष सोन्याला पर्याय म्हणून काही डिजिटल किंवा ई-गोल्ड स्वरूपाची उत्पादनं विकत असल्याचं निरदर्शनाला आल्याचं सेबीनं सांगितलं. अशा योजना सेबीच्या नियमनाबाहेरच्या असून अशा गुंतवणुकीला कोणतंही संरक्षण मिळणार नाही, असा इशाराही सेबीनं दिला आहे.