June 24, 2025 1:31 PM June 24, 2025 1:31 PM

views 13

SCO संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताचं नेतृत्व करतील

शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक यंदा चीनच्या अध्यक्षतेखाली किंगडो इथं होत आहे. या दोन दिवसांच्या बैठकीला उद्या सुरुवात होईल. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात भारताचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होईल. या बैठकीत, संरक्षण मंत्री प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, दहशतवाद रोखण्याचे प्रयत्न आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या संरक्षण मंत्रालयांदरम्यान परस्पर सहकार्य यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.