February 6, 2025 9:55 AM February 6, 2025 9:55 AM

views 12

परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी SCOच्या नवनियुक्त मुख्य सचिवांची नवी दिल्लीत घेतली भेट

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल शांघाय सहकार्य परिषदेचे अर्थात SCOचे नवनियुक्त मुख्य सचिव नुरलन इरमेमेकबाव यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली आणि या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. भारताचं शांघाय परिषदेतील काम आणि सुरक्षित SCO कसं असावं याविषयावर यावेळी चर्चा झाली, असं जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. यावेळी त्यांनी इजिप्तचे परराष्ट्रमंत्री डॉ बद्र अबदेलट्टी यांच्याबरोबर दूरध्वनीवरुन चर्चा केली. दोनही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध आणि नव्य...

October 15, 2024 1:45 PM October 15, 2024 1:45 PM

views 1

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आज दोन दिवसीय दौऱ्यासाठी इस्लामाबादला रवाना होणार

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आज दोन दिवसीय दौऱ्यासाठी इस्लामाबादला रवाना होणार आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री ९ वर्षात पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये जात आहेत. या बैठकीदरम्यान पाकिस्तान सोबत कुठलीही द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचं जयशंकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय. भारतासह इराण, कझाकस्तान, चीन, किर्गिज प्रजासत्ताक, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उजबेकिस्तान हे ९ देश या संघटनेचे सदस्य आहेत.