October 7, 2025 8:20 PM October 7, 2025 8:20 PM

views 49

राज्यात मुला-मुलींच्या शाळांचे एकत्रीकरण!

एकाच आवारात असलेल्या असलेल्या मुला-मुलींच्या शाळांचे एकत्रीकरण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. याशिवाय इच्छुक असलेल्या कन्या शाळांना सहशिक्षणाच्या अर्थात मुला-मुलींच्या एकत्र शाळेत रुपांतरित करायला राज्य सरकार मान्यता देणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यासंदर्भातला शासन आदेश आज जारी झाला.

May 13, 2025 10:26 AM May 13, 2025 10:26 AM

views 9

जम्मूकाश्मीरमधील शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू

जम्मू आणि काश्मीर सरकारनं जम्मू तसंच काश्मीर विभागाच्या काही जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालयं आजपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री सकीना इटू यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. सीमाभागातील शैक्षणिक संस्था मात्र विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

September 10, 2024 3:26 PM September 10, 2024 3:26 PM

views 6

अकोला जिल्ह्यातील १ हजार ८२५ शाळांमध्ये सखी सावित्री समित्या स्थापन

शालेय विद्यार्थ्यांच्या  सुरक्षिततेच्या दृष्टीने अकोला जिल्ह्यातल्या १ हजार ८२५ शाळांमध्ये गेल्या ६ तारखेपर्यंत सखी सावित्री समित्या स्थापन करण्यात आल्या असून शाळा स्तरावर या समित्यांकडून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये या समित्या स्थापन करण्याची उपयुक्तता अधिक वाढली आहे. त्याअनुषंगाने अकोला जिल्ह्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि अनुदानित तसंच विनाअनुदानित १ हजार ८३५ पैकी १ हजार ८२५ शाळांम...