June 15, 2024 10:07 AM

views 29

उन्हाळी सुट्यानंतर शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ

उन्हाळी सुट्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार असून, त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने तयारी केली आहे. जिल्ह्यातल्या महानगरपालिकेच्या सर्व शाळा, बालवाड्या, १६ जिल्हा परिषदेच्या शाळा आणि ९५ खासगी अनुदानित शाळांमधल्या ३८ हजार विद्यार्थ्यांना आज नियमित पोषण आहारासोबतच मिठाई देण्यात येणार आहे.